पिंपरी : निवडणुकीमध्ये मतदारांना वोटर स्लिप पोहोचविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना कसरत करावी लागते. अर्धवट पत्ता, मनुष्यबळाची कमतरता, प्रिंटींग खर्च तसेच वेळेची मर्यादा यामुळे उमेदवारांना ही प्रक्रिया खर्चिक व कटकटीची वाटते.
यावर उपाय म्हणून दिवाणजी सॉफ्टवेअर सोल्युशने ‘राजकारण’ या नावे अॅप तयार केले असून मतदारांना यामधून डिजीटल वोटर स्लिप व्हॉट्सअॅप व्दारे देण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे.
यामुळे वोटर स्लिप मतदारांपर्यंत पोहोचविणे सहज शक्य होणार आहे. प्रथमच मोबाईल अॅपमधून ब्ल्यूटूथ प्रिंटरने प्रिंट देखील करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
दिवाणजी सॉफ्टवेअर सोल्युशनचे डायरेक्टर उदय फडके यांनी याबाबत माहिती दिली आहे. निवडणुकीसाठी मतदारांच्या यादीचे तसेच प्रचार प्रक्रियेचे नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी दिवाणजी सॉफ्टवेअर सोल्युशनने संगणक प्रणाली सर्वप्रथम विकसित केली आहे.