पिंपरी (प्रतिनिधी):- आज बाहेरून कोणीतरी येतो आणि पिंपरी चिंचवडचा विकास आम्हीच गेलाय असा दावा करतो. वास्तविक पाहिले तर आज हे शहर स्थानिकां च्या त्यागामुळेच उभे राहिले आहे. असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी केले
पिंपरीगाव प्रभाग क्र 21 मधील भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार संदीप वाघेरे यांच्या निवडणुक कचेरीचे उद्घाटन खासदार साबळे यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, डॉ. गणेश शिंदे,भाजप सरचिटणीस बाबू नायर, युवा उद्योजक संदीप वाघेरे, धनराज आसवानी, राणी कापसे, मोनिका निकाळजे, ज्योतीका मलकानी,शुभांगी वाघेरे ,आशा बुलानी, माजी नगरसेवक संतोष कुदळे ,योगेश वाघेरे ,गणपत जाचक ,किसन कापसे ,अण्णा कापसे ,पंडित कापसे ,चंद्रकांत गव्हाणे ,आप्पा रसाळ ,रामभाऊ कुदळे ,अंकुश कापसे ,कुणाल सातव ,हरिष वाघेरे ,शिवाजी वाघेरे ,बाळासाहेब वाघेरे ,सुरेश निकाळजे ,प्रतिभा अरगडे ,निर्मला गायकवाड ,स्वाती शिंदे ,दिपाशा बुलाई ,तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार साबळे म्हणाले की, पिंपरीगाव ओलांडल्यावर पिंपळे सौदागर पहा, विकासाची दृष्टी असेल तर विकास कसा होतो ते पहायला मिळते. पंतप्रधानांनी जे स्वप्न दाखविले ते सत्यात उतरवायची असेल तर मनपात भाजपचीच सत्ता हवी. पिंपरीत भाजपाची सत्ता आली तर केंद्राचा पैसा मिळेल. मनपात राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचारामुळे स्मार्टसिटीतून वगळण्यात आले होते. मात्र विश्वास दाखविल्यावर समावेश झाला. पिंपरीचा विकास स्थानिकांच्या त्यागावर झाला. पिंपरी चिंचवडकरांच्या त्यागावर झालाय. म्हणून आमचा विकास आम्हीच करू असा नारा देऊ आता.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, पिंपरी गाव सुविधांपासून वंचित राहिल आहे.जयहिंद हायस्कूल एवढीच पिंप्रीची ओळख आहे विकास झालेला नाही. परिपूर्ण सुविधा मिळाल्या नाही हे नागरिकांचे दुर्दैव आहे. पिंपरीगावातील कुठलाच विकास आराखडा विकसित झाला नाही. पुतळे, तुनतुणे उभारले म्हणजे विकास होत नाही. अशी टीका त्यांनी केली दुरदृष्टीचे नेतृत्व मिळाले नाही म्हणून पिंपरीगाव सुविधांपासून वंचित राहिले.असल्याचा आरोप जगताप यांनी केला
युवा उद्योजक संदीप वाघेरे म्हणाले की, या निवडणुकीत सर्व स्थानिकांनी परिवर्तनाचा निश्चय केला आहे
चिंचवड प्रमाणे पिंपरीचा विकास झालेला नाही. येत्या पाच वर्षात पिंपरीगावचा सर्वांगिण विकास करण्याची संधी मला द्यावी असे आवाहन वाघेरे यांनी केले.