प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानिंच्या आठवणींना उजाळा
साक्री:-प्रचिती इंटरनॅशनल स्कूल-साक्री येथे रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायनानंतर, पथसंचलन करून तिरंगी ध्वजास ध्वजसलामी दिली. सपना देवरे यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले. त्यानंतर या कार्यक्रमात २६ जानेवारी कार्यक्रमानिमित्त अश्मीरा पिंजारी (इ१ली.), समिक्षा चव्हाण (इ.८वी-अ), ओम अहिरराव (इ.९ वी.) या विद्यार्थ्यांनी व हेमांगी बोरसे व कुणाल पानपाटील यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी भाषणे दिली. त्यांनी सांगितले की, भारतात दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जाते. भारताची राजधानी दिल्ली येथे मोठा कार्यक्रम आयोजित होतो. भारताच्या इतिहासातील २६ जानेवारी ही एक महत्त्वाची तारीख आहे. भारतात २६ जानेवारी १९५० या दिवशी भारत देशासाठी संविधान लागू करण्यात आले. भारत एक धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीचा पालन करणारा देश बनला. संविधान हा भारतीय लोकशाहीचा कणा आहे. भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले. पण स्वातंत्र्यानंतर देशातल्या सगळ्या लोकांना एकत्र आणणारे संविधान आपल्याकडे नव्हते. त्यामुळे संविधान सभा स्थापन करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताचे संविधान तयार करण्यात आले. त्या संविधानात समाविष्ट असलेली कर्तव्य आणि अधिकार यांचाही विचार आपण करायला हवा. देशाच्या आत्मनिर्भरतेबद्दलची, स्वातंत्र्यबद्दलची आणि लोकशाहीबद्दलची आपली एक बांधिलकी आहे. हा दिवस त्याचे प्रतीक आहे. देशाच्या विविधतेतल्या एकात्मतेचा आधार आहे. भारतीय संविधान हे जगातलं सगळ्यात मोठे लिखित संविधान आहे.या संविधानामुळे देशाच्या प्रत्येक नागरिकाला समानतेच्या, स्वातंत्र्याचा आणि न्यायाचा हक्क मिळाला आहे. भारत देश विविधतेसाठी ओळखला जातो. येथे शेकडो भाषा आणि बोलीभाषा बोलल्या जातात. इथल्या संस्कृती परंपरेतही वैविध्य आहे. पण संविधान आपल्याला जात, धर्म, लिंग आणि भाषेच्या आधारावर कोणताही भेदभाव न करण्याचा सल्ला देते. यावर्षी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन गेली आहेत. आजही आपल्या देशात अनेक समस्या आहेत. अनेक आव्हाने आहेत. दारिद्र्य, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारसारख्या भारताच्या विकासाच्या मार्गातले मोठे अडथळे आहेत. प्रत्येक समस्येवर मात करणे शक्य आहे. हे आपण विसरता कामा नये. एकत्र येऊन प्रयत्न केला तर सगळं काही शक्य आहे. प्रत्येक नागरिकाने आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडली. तर भारत कायम एक शक्तिशाली देश म्हणून जगासमोर उभा राहील. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचा संकल्प करूया. असा संदेश विद्यार्थ्यांना भाषणातून देण्यात आला. तसेच झाशीची राणीची वेशभूषा- इशिता सावंत (इ.२री-ब) लोकमान्य टिळकांची वेशभूषा- अथर्व बेडसे (इ.२री-अ),सुभाषचंद्र बोस यांची वेशभूषा- लोकेश भामरे (इ.२री-ब), महात्मा गांधीजी यांची वेशभूषा- कार्तिक देसले ( इ.२री-अ),भगतसिंग यांची वेशभूषा-मन्वय देवरे (इ.२री-ब), राजगुरू यांची वेशभूषा-तन्मय काकुस्ते (इ.२री.-ब),सुखदेव यांची वेशभूषा-रुद्रांक्ष शिंदे (इ.२री-ब ) या सुंदर अशा वेशभूषा शालेय विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
तसेच ऐ वतन ऐ वतन ,तेरी मिट्टी,नन्ना मुन्ना राही हू,देश रंगीला..रंगीला..शुभ दिन आयो…कंधो से मिलते कंधे …सुनो गोरसे दुनियावाले…जय हो… जय हो… या देशभक्तीपर गाण्यांवर इ.नर्सरी ते इ.१० वी. पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्कृष्ट असे देशभक्तीपर नृत्य सादर करून सर्व विद्यार्थ्यांचे व प्रमुख पाहुण्यांचे, श्रोत्यांचे मने आकर्षित करून घेतली. देशभक्ती व देशप्रेम विषयक सुंदर असा संदेश आपल्या नृत्यातून विद्यार्थ्यांनी दिला. देशभक्ती विषयक नृत्यांचे संयोजन- श्रावण अहिरे, हेमांगी गवांदे, सपना ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य सेनानींची वेशभूषा व घोषवाक्य यांचे संयोजन-जागृती जाधव यांनी केले. या कार्यक्रमात सुंदर रांगोळी व सजावट किरण गवळी,मनोज भिल ,भूपेंद्र साळुंखे, दीपमाला अहिरराव यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -स्मिता नेरकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन स्मिता नेरकर व कुणाल देवरे यांनी केले. या कार्यक्रमात शेवटी भारत माता की जय.. वंदे मातरम…. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो.. अशा घोषणा देऊन.सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ड्रायव्हर बंधू यांच्या सहकार्याने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला.