नवीन मित्र – मैत्रिणींसोबत गजबजली प्रचिती पब्लिक स्कूल; पिंपळनेर येथे शाळेचा पहिला दिवस हाऊसफुल्ल
पिंपळनेर : नवीन मित्र – मैत्रिणींसोबत प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी पहिला दिवस हाऊसफुल्ल ठरला. शाळेकडून झालेल्या स्वागत पाहून चिमुकल्यांचा किलबिलाट आनंद देवून गेला.
आज, गुरुवार रोजी शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पुन्हा ते मित्र, पुन्हा ती मजा…पुन्हा तो शाळेत मिळणारा आनंद विद्यार्थांचा किलबिलाट, विद्यार्थ्यांचे उत्सुकता, काही नवीन चेहऱ्यांच्या मनात भरलेली भरलेली धडकी, शिक्षकांना भेटण्याची घाई, पालकांची गर्दी अशा उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला.
शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला. शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्येची देवता सरस्वती माता यांचे औक्षण विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण व फुलांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचे स्वागत यावेळी झाले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसून येत होते. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांना भेटून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर सर्व शिक्षकांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी खूप आनंदित होते. विद्यार्थ्यांचे स्वागत सर्व प्रकारच्या हाय फाय नमस्कार डान्स आलिंगन देऊन ऍक्टिव्हिटी द्वारे स्वागत केले. जुने मित्र भेटल्यावर अनेक मुले आनंदात होती. बसमध्ये देखील अनेक मुलांनी धमाल मस्ती केली. शाळेच्या पहिल्याच दिवशी साजरा होणाऱ्या शालेय प्रवेश निमित्ताने विद्यार्थ्यांना आपणच सेलिब्रिटी असल्याचा एक अनोखा फील झाला. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना आनंद देणारा असतो. कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी योजना मॅम अनिता मॅम , सरिता मॅम यांनी रेखाटली. तसेच फलक लेखन योजना मॅम, किरण देवरे यांनी केले.सुंदर असे चित्रफीत कल्याणी यांनी केले. सुंदर असे विद्यार्थ्यांचे छायाचित्र काजल राजपूत यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन रिनल सोनवणे व जागृती बिरारिस यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.