प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या बारावीच्या निकालात तीन विद्यार्थ्यांची बाजी; उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
साक्री: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत आज, सोमवार दि. ५ मे २०२५ रोजी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा इ.१२ वीचा निकाल जाहीर झाला.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने यावर्षीच्या निकालातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळवून संस्थेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत पाटील करिष्मा देवेंद्र याने ८१.५० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. मोरे हर्षवर्धन प्रवीण याने ८०.५० टक्के गुणांसह द्वितीय, तर देवरे वैष्णवी दीपक या विद्यार्थिनीने ७८.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले.
या निकालात प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या करिष्मा पाटील, हर्षवर्धन मोरे आणि वैष्णवी देवरे या विद्यार्थ्यांचा शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे आणि तुषार देवरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.