धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात प्रचिती इंटरनॅशनल स्कूलची दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी; सलग सात वर्षांपासून १००% निकालाची यशस्वी परंपरा!
साक्री: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात एक आदर्श आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कावठे (साक्री) ने सीबीएसई बोर्ड, दिल्ली यांच्या मार्फत जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात झालेल्या या परीक्षेत शाळेने १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे, शाळेतील तब्बल ८०% विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले असून, १८ विद्यार्थ्यांनी साक्री तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी:
या परीक्षेत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
९३% गुण: पूर्व देसले (शाळेत प्रथम), कुणाल पाटील (शाळेत द्वितीय), खुशी पंजाबी (शाळेत तृतीय), ९०% गुण: हर्षवर्धन पाटील (शाळेत चतुर्थ). ८९% गुण: निशांत पाटील, श्रावणी कुंभार, अनुष्का भदाणे. ८८% गुण: अनुष्का पिंपळे, जय जाधव, मेघना चव्हाण. ८७% गुण: यशश्री सोनवणे. ८६% गुण: दुर्गेश शेळके, रसिका साळुंखे, गिरीश देवरे, ओम जाधव, पूर्वा पवार, उत्कर्षा भांडे.
इतर गुणवंत विद्यार्थी: युवराज चौधरी, जान्हवी ढमाले, अनुष्का पाटील, मानस देसले, वैभव सोनवणे, ललित देसले, युवराज बच्छाव, ऋतुजा सावंत, वेदांत पाटील, अथर्व देशमुख, लक्ष पोपळी, संकेत देसले, रोशनी ठाकरे, कल्याणी माळवे.
विषयनिहाय उत्कृष्ट गुण:
विद्यार्थ्यांनी केवळ सरासरी गुणांमध्येच नव्हे, तर विषयनिहाय देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मराठी विषयात ३ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. यासोबतच, ४ विद्यार्थ्यांनी ९९ गुण, २ विद्यार्थ्यांनी ९८ गुण, ७ विद्यार्थ्यांनी ९७ गुण, ६ विद्यार्थ्यांनी ९६ गुण, ६ विद्यार्थ्यांनी ९५ गुण, ११ विद्यार्थ्यांनी ९४ गुण, ११ विद्यार्थ्यांनी ९३ व ९२ गुण आणि ५ विद्यार्थ्यांनी ९१ व ९० गुण प्राप्त केले आहेत. ८९ ते ७४ गुण मिळवणाऱ्या २४ विद्यार्थ्यांचाही मराठी विषयात उल्लेखनीय समावेश आहे.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयातही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. या विषयात १६ विद्यार्थ्यांनी ९८ गुण, १४ विद्यार्थ्यांनी ९७ गुण, १२ विद्यार्थ्यांनी ९६ गुण, १३ विद्यार्थ्यांनी ९५ गुण आणि १९ विद्यार्थ्यांनी ९४ ते ८६ दरम्यान गुण मिळवले आहेत. एका विद्यार्थ्याने ९९ गुण प्राप्त केले आहेत.
विद्यार्थ्यांच्या नेत्रदीप कामगिरीचे कौतुक
या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे आणि तुषार देवरे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाला आणि शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांना दिले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांमुळेच हे यश शक्य झाले आहे.
” प्राचार्य वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करताना सांगितले की, “प्रचिती इंटरनॅशनल स्कूलने केवळ चांगले विद्यार्थी घडवण्यावरच लक्ष केंद्रित केले नाही, तर त्यांना उत्तम नागरिक बनवण्याची मूल्ये रुजवली आहेत. शाळेतील सकारात्मक वातावरण, शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन आणि आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. यावर्षीच्या निकालाने स्कूलच्या शैक्षणिक परंपरेला आणखी मजबूत केले आहे आणि भविष्यातही असेच उत्कृष्ट निकाल देण्याची प्रेरणा मिळाली आहे. शाळेची ही ७ वर्षांची १००% निकालाची यशोगाथा धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील शैक्षणिक इतिहासात नेहमीच सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल.”
एकंदरीत, प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट प्रदर्शन करत शाळेच्या १०० टक्के निकालाच्या परंपरेला यशस्वीरित्या पुढे नेले आहे. या यशाबद्दल विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात आनंदाचे वातावरण असून, गुणवंत विद्यार्थ्यांच्या या कामगिरीने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.