प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे
श्री गणेश मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम उत्साहात साजरा







दिनांक 27 ऑगस्ट वार बुधवार रोजी श्री गणेश चतुर्थी सणाचे महत्त्व लक्षात घेऊन शाळेत श्री गणेशाचे ढोल ताशे वाजत गाजत श्री गणेशाची मूर्ती शाळेत आणण्यात आली. शाळेच्या प्रांगणातील ऑफीस जवळ गणेश मूर्तीचे हिंदू संस्कृती प्रमाणे श्री समाधान जाधव सर व दिव्या जाधव मॅम यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर शाळेचे संचालक अध्यक्ष श्री. प्रशांत भिमराव पाटील साहेब यांच्या सहमतीने बाबांचे स्वागत करण्यात आले. शाळेचे समन्वयक श्री. राहुल अहिरे सर यांनी गणेश जी ची मूर्ती आणली. व शाळेच्या प्राचार्या अनिता पाटील मॅम यांनी गणपतीचीपूजा करून स्वागत केले. व सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही गणेशाची आरती गाऊन भा द्रपद तिथी शुभमुहूर्तावर श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. “आला रे आला, गणपती आला…” गणपती बाप्पा मोरया”… अशा गणेशाच्या घोषणा देण्यात आल्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती आदराचे तसेच प्रथम स्थान मानले जाते. प्रत्येक शुभकार्यासाठी गणपतीचे स्थान महत्त्वाचे व प्रथम मानले जाते. गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते. संपूर्ण भारतामध्ये गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये गणेशाचे आगमन डोल ताशांनी केले जाते. सर्व लहान मोठ्यांपासून प्रत्येकाच्या मनात गणपती रायाचे नाव मुखात असते. गणपतीला मोदक हा सर्वात आवडता पदार्थ आहे. या दहा दिवशी गणपतीची रोज सकाळी व सायंकाळी आरती म्हटली जाते. मोदकाचा प्रसाद दिला जातो. हे सर्व लक्षात घेऊन हिंदू संस्कृतीमध्ये गणपतीचे महत्व विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावे यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत मोठ्या उत्साहात केले जाते. या ठिकाणी सुंदर अशी सजावट केली जाते. मूर्तीच्या आजूबाजूला देखावे तयार करतात व फुलांची भव्य आरास काढली जाते व दररोज वेगवेगळ्या इयत्तेची मुले मोठ्या श्रद्धेने आणि भावाने गणपतीची आरती करतात व आरती पूर्ण झाल्यावर सर्वांना गोड पदार्थ वाटतात.
शाळेचे चेअरमन अध्यक्ष श्री. प्रशांत भीमराव पाटील साहेबांनी सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन अश्विनी पगार व सायली पवार मॅम यांनी केले. उत्तम सजावटीसाठी अष्टविनायकाची प्रतिमा सरस्वती प्रतीक्षा अहिरे व प्रेरणा नांद्रे या यांनी उत्कृष्टरित्या अष्टविनायकाची प्रतिमा काढली व सुंदर अशी सरस्वती माता ची प्रतिमा मयूर मयुरी सोनार व वैशाली वाघ मॅम यांनी केली. सुंदर असे फलक लेखन किरण देवरे मॅम व वैशाली मॅम यांनी केले. सुंदर अशी फुले अर्चना मॅम, सरिता मॅम , किरण मॅम, सुनीता मॅम यांनी केले. त्याचबरोबर जास्वंदाची फुले वैशाली जगताप व शितल शिंपी मॅम यांनी तयार केले. संस्कार भारती सुरेख अशी रांगोळी जागृती बिरारीस व दिव्या जाधव मॅम यांनी काढली. कलश स्थापनेसाठी कमळाची फुले किरण देवरे मॅम जागृती बिरारीस मॅम यांनी केले. अष्टविनायक मूर्तीची विशेष नावे योजना जाधव मॅम यांनी साकारली.
मयुरी मॅम यांनी सुंदर असे छायाचित्र काढले. व जागृती मॅम यांनी सुंदर व्हिडिओ काढले. सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गणेशाच्या आगमनाची तयारी केली. ब्राह्मण दादाच्या मंत्र उच्चाराने श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली व आरती करून सगळ्यांना मोदकाचा व पेढ्यांचा प्रसाद वाटण्यात आला. श्री गणेश मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम श्री गणेशाच्या गजरात व मोठ्या भाव पूर्ण भक्तीने भावनेने आनंदात साजरा करण्यात आला.


















