गणेशोत्सवात उजळला प्रचिती परिवार !


साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, साक्री येथे गणेश चतुर्थीच्या पावन दिनानिमित्त गणपती बाप्पाची स्थापना मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून शाळेचे परिसर फुलांनी व आकर्षक सजावटीने सजवले. या सोहळ्याचे इन्चार्ज श्री. कुणाल देवरे, सौ. नितू पंजाबी व श्रीमती दिपमाला अहिरराव यांनी यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली. संस्थेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व समजावले तसेच सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक व सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा मिळाली. शाळेच्या प्राचार्य सौ. वैशाली लाडे, समन्वयक श्री. वैभव सोनवणे व श्री. तुषार देवरे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. डेकोरेशन टीमच्या विशेष प्रयत्नामुळे गणेशमूर्तीचे मंडप आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. गणेश मंदिरातही विशेष सजावट करण्यात आली. मूर्तीची प्रतिष्ठापना श्री. हिरल सोनवणे व श्री. मनोज सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. शिक्षक, ड्रायव्हर मावशी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येकजण आनंदाने म्हणत होता – “माझा बाप्पा किती छान दिसतोय!” वातावरण अत्यंत मंगलमय आणि भक्तिभावपूर्ण झाले. सविता लाडे यांनी विद्यार्थिनींच्या मदतीने परिसर अत्यंत सुंदर सजवला. सर्वांनी एकत्र येऊन “गणपती बाप्पा मोरया!” च्या गजरात उत्सवाची शोभा वाढवली.


















