प्रचिती पब्लिक स्कूल येथे गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

पिंपळनेर (ता. साक्री) – प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे दिनांक ३० ऑगस्ट रोजी गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व ज्ञानवर्धक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळेचे समन्वयक श्री. राहुल पाटील व मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि ज्ञानाचा उत्सव असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी गीत, स्तोत्र, गोष्टी व कथामालेतून बाप्पाचे महत्त्व अधोरेखित केले. लहानग्या एलकेजी व यूकेजीच्या मुलांनी सुंदर गाणी व गोष्टी सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी गणपती स्तोत्र आणि कथा प्रभावीपणे सादर केल्या.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अष्टविनायक गणपतीची माहिती दिली

- मयुरेश्वर मोरेगाव – अर्चना मॅडम
- सिद्धिविनायक सिद्धटेक – किरण मॅडम
- बल्लाळेश्वर पाली – सुनीता मॅडम
- वरदविनायक महाड – योजना मॅडम
- चिंतामणी थेऊर – दिव्या मॅडम
- गिरिजात्मक लेण्याद्री – जगताप मॅडम
- विघ्नेश्वर ओझर – सरिता मॅडम
- महागणपती रांजणगाव – प्रतीक्षा मॅडम
या कार्यक्रमाचे आयोजन अश्विनी पगार व सायली पवार यांनी केले. कार्यक्रमात आकर्षक फलक लेखन प्रतीक्षा मॅडम यांनी केले, तर प्रेरणा नंद्रे यांनी गणपतीचे चित्र रेखाटले. शितल मॅडम व वैशाली जगताप मॅम यांनी फुलांची सजावट साकारली. जागृती आणि वैशाली वाघ यांनी देखील शाळेचे नाव सजावटीत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सरिता मॅम यांनी केले.
मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करताना गणपती हा बुद्धीचा देवता असल्याने त्याचा वरदहस्त विद्यार्थ्यांवर राहावा अशी प्रार्थना केली. समन्वयक श्री. राहुल पाटील यांनी गणेशाचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना भक्तीभावासोबतच अष्टविनायक परंपरेचे ज्ञान मिळाले. गीत, स्तोत्र आणि गोष्टीमधून गणेशभक्तीचे सुंदर दर्शन घडले.
प्रचिती पब्लिक स्कूलचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व संस्कारांचे संचार झाले.



















