माननीय अध्यक्ष श्री प्रशांत पाटील साहेब यांची जेष्ठ कन्या कु .प्रचिती प्रशांत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा




पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी आमच्या शाळेत प्रचितीचा वाढदिवस अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या वाढदिवस समारंभाचे विशेष मार्गदर्शन आदरणीय शाळेचे संस्थापक माननीय श्री प्रशांत भीमराव पाटील यांच्या नियोजनात करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रातिक्षा मॅडम यांनी संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात झाली. तसेच शाळेच्या प्रारंगणात सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती LKG च्या विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला शाळेत आनंदाचे वातावरण तयार झाले. शाळेचे समन्वयक राहुल अहिरे सर व मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांनी प्रचितीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व तिला दीर्घायुष्य लाभो असा आशीर्वाद ही दिला. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी वस्तीमधील गरीब मुलांना फराळ व केक वाटप करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघण्यात आला. प्रचितीला त्यांचाही आशीर्वाद मिळाला. शाळेचा फळा “Happy Birthday Prachiti” असे आकर्षक रंगीबेरंगी अक्षरात सजवून लिहिण्याचे काम दिव्या मॅम यांनी केले. तसेच अर्चना मॅम व किरण मॅम यांनी सुंदर असं बॅनर तयार केले.
छायाचित्रणाची जबाबदारी मयुरी मॅडम यांनी उत्तमरीत्या निभावली. या क्षणाचे व्हिडिओ चित्रीकरण जागृती मॅडम यांनी केले, ज्यामुळे हा आनंदाचा दिवस स्मरणात राहील. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थित लावण्यात आली होती, त्यामुळे सर्वांनी कार्यक्रम शिस्तबद्धपणे अनुभवला.
कार्यक्रमात सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी प्रचितीला आशीर्वाद देऊन दीर्घायुष्य व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही टाळ्यांच्या गजरात प्रचितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी केक सर्वांना वाटण्यात आला. प्रचितीचा वाढदिवस समारंभ हा शाळेतील एक संस्मरणीय सोहळा ठरला. शिक्षक, विद्यार्थी आणि मित्र-मैत्रिणी यांच्या उपस्थितीत तो आनंद सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला.



















