क्रिकेटच्या पटांगणावर प्रचितीचा झेंडा फडकला!
तालुकास्तरीय विजयानंतर संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी भक्कम निवड

साक्री : क्रीडांगणावर आपल्या दमदार खेळाची छाप उमटवत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या क्रिकेटवीरांनी पुन्हा एकदा शाळेचा मान उंचावला आहे. तालुकास्तरीय शालेय पावसाळी क्रीडा स्पर्धेत 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत प्रचितीच्या संघाने दणदणीत विजय मिळवत विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावावर केली.
या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर प्रचितीच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून हा क्षण शाळेसाठी अभिमानाचा ठरला आहे. 💐🌺
खेळाडूंच्या या भव्य विजयाबद्दल शाळेचे चेअरमन श्री प्रशांत भीमराव पाटील यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत संघाचे मनोबल वाढवले. या विजयामागे क्रीडा शिक्षक श्री. वैभव सोनवणे व श्री. कुणाल देवरे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण लाभल्याचे विशेषत्वाने नमूद करण्यात आले.
✨ आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही प्रचितीचा झेंडा उंचावेल, अशी अपेक्षा संपूर्ण प्रचिती परिवार व्यक्त करीत असून खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! ✨



















