प्रचिती पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा



शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील मार्गदर्शक. शिक्षक आपल्याला ज्ञान देतात, प्रेरणा देतात आणि जीवनमूल्य शिकवतात. शाळेचे चेअरमन श्री प्रशांत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. शाळेचे समन्वयक राहुल अहिरे सर, मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम यांनी सरस्वती माता व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका अनुष्का अहिराव व चैताली भदाने यांनी प्रास्ताविक केले व यांना मार्गदर्शन मयुरी सोनार मॅम यांनी कले.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो. शिक्षक दिन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खास दिवस असतो या दिवशी आपण आपल्या शिक्षकाच्या कार्याची आणि त्यांच्याविषयीच्या आदराची भावना व्यक्त करतो असे सांगितले. त्याचबरोबर शाळेच्या विद्यार्थिनी विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका यांच्या वेशभूषा साकारून वर्ग घेतले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इयत्ता १ ते ८वी च्या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. व विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या घोषणा दिल्या.
मार्गदर्शन दिव्या मॅम यांनी केले. तसेच शाळेचे समन्वयक राहुल अहिरे सर व शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुष्कर पाटील याने समन्वयक यांची भूमिका साकारली. तर लावण्या खैरनार या विद्यार्थिनीने मुख्याध्यापिका यांची भूमिका केली. या दोघांनी आपापली भूमिका उत्तमरीत्या साकारल्या. विद्यार्थी शिक्षकांनी तासिकेवर जाऊन अध्यापन केले. मुख्याध्यापिका व समन्वयक यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे निरीक्षण केले. शिक्षक दिनाची माहिती अश्विनी पगार यांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन सुनीता जाधव यांनी केले. सुंदर असे फलक लेखन योजना जाधव सायली पवार यांनी केले. सुंदर अशी रांगोळी वैशाली जगताप व शितल मॅम यांनी रेखाटली. विद्यार्थी शिक्षकांचे तासिका वेळापत्रकाचे काम अर्चना देसले व किरण देवरे यांनी केले. क्लास कंट्रोल मार्गदर्शन सरिता मॅडम यांनी केले. तसेच सुंदर असे बॅनर डेकोरेशन प्रतीक्षा अहिरे, किरण देवरे ,अर्चना देसले, वैशाली जगताप, अश्विनी पगार सरिता अहिरे यांनी केले.
सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकांनी दिलेली नियोजित कामे केली विद्यार्थ्यांना रांगेत बसविणे शाळेत घरी जाताना रांगेत जाणे अशा सर्व प्रकारच्या सूचनांचे पालन केले. प्रियल नायक हिने आभार मानले. मोठ्या आनंदात विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षक दिन साजरा केला. सुंदर असे छायाचित्र प्रतीक्षा अहिरे यांनी व व्हिडिओ वैशाली वाघ यांनी काढला. तसेच या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



















