अनंत चतुर्दशी निमित्त प्रचिती पब्लिक स्कूल येथे सत्यनारायणाची महापूजा महाप्रसाद तसेच गणपती विसर्जनाचा कार्यक्रम जल्लोषात साजरा





प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये यंदाचा गणेशोत्सव अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे आदरणीय चेअरमन साहेब व सौ. कविता पाटील मॅडम यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली. मंत्रोच्चारामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण आध्यात्मिक आणि प्रफुल्लित झाले होते. माननीय प्रशांत पाटील साहेब यांच्या दोघी कन्या प्रचिती आणि स्वरा यांची कार्यक्रमाला उपस्थिती प्रार्थनीय ठरली.
गेल्या दहा दिवसांपासून शाळेत गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती. या कालावधीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मनोभावे पूजा-अर्चा, आरती आणि भक्तिगीतांद्वारे बाप्पाचे दर्शन घेतले. दररोज पाच आरत्या, प्रसाद व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी गणेश स्तोत्र, कथा वाचन, गीतगायन, घरगुती सजावट यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत आईसोबत घेतलेले फोटो हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा भाग ठरला. यामध्ये पालकांनीही सक्रिय सहभाग घेतला.
गणपती विसर्जनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. ६वी ते ८वीच्या विद्यार्थिनींनी मंगळागौर गीतावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. तसेच विविध गणेशगीतांवर नृत्य सादर करून आनंद व्यक्त करण्यात आला.
विसर्जनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समन्वयक श्री. राहुल अहिरे सर यांनी त्यासाठी मोलाचे सहकार्य केले. सर्वांनी आनंदाने महाप्रसादाचा लाभ घेतला.
या संपूर्ण उत्सवाचे आयोजन अश्विनी पगार व सायली पवार यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले. शाळेच्या प्राचार्या सौ. अनिता पाटील मॅडम यांचे सतत मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यात सक्रिय सहभाग घेतला.
रांगोळी सजावटीचे काम जागृती मॅडम, दिव्या मॅडम, सरिता मॅडम व सुनीता मॅडम यांनी केले. फलकलेखन वैशाली वाघ व किरण मॅडम यांनी केले. गणपती सजावटीसाठी अर्चना मॅडम, किरण मॅडम, प्रेरणा मॅडम, वैशाली जगताप मॅडम, योजना मॅडम, प्रतीक्षा मॅडम व शितल मॅडम यांनी परिश्रम घेतले. चित्रफीत तयार करण्याचे कार्य जागृती मॅडम यांनी केले, तर छायाचित्रण मयुरी मॅडम यांनी केले.
मंगळागौर नृत्य सुनीता मॅडम व प्रतीक्षा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. संपूर्ण बातमी लेखनाचे कार्य वैशाली जगताप मॅडम व सरिता मॅडम यांनी केले.
अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला अशी घोषणा देत आज गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले विसर्जनासाठी सर्व शिक्षक वृंद, समन्वयक समन्वयक राहुल पाटील सर प्राचार्य अनिता पाटील मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी सर्व ड्रायव्हर बंधू यांनी गणपती विसर्जन मिरवणूक सहभागी झाले तसेच गणपती विसर्जनाच्या वेळेस विद्यार्थ्यांनी नृत्य करून गणपती बाप्पाला निरोप दिला गणपती बाप्पाचे विसर्जन लाटीपाडा धरण येथे करण्यात आले गणपती बाप्पाची आरती करून प्रसाद वाटप करून गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
प्रचिती पब्लिक स्कूलचा हा गणेशोत्सव हा एक संस्मरणीय आणि एकात्मतेचा अनुभव ठरला.



















