साक्री तालुका पावसाळी बुद्धिबळ स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचा परचम
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
साक्री : साक्री तालुका शासकीय पावसाळी बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अफाट कौशल्य, परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत जिल्हास्तरावर आपली निवड निश्चित केली.
* विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी :
Under 19 : प्रथम क्रमांक : वेदिका बदामे, द्वितीय क्रमांक : आराध्य शिरसाठ
Under 17 : प्रथम क्रमांक : दुर्वा देवरे, द्वितीय क्रमांक : संघर्षा वाघ
Under 14 : प्रथम क्रमांक : तनिष्का जैन
* विद्यार्थ्यांची प्रभावी कामगिरी :
Under 19 : प्रथम क्रमांक : निल तोरवणे, द्वितीय क्रमांक : युगान देसले, तृतीय क्रमांक : केयूर मोरे
Under 17 : प्रथम क्रमांक रोशन पाटील
. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रचिती परिवाराचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
. या विजयानंतर शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रशांत पाटील सरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
. प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना अधिक यशस्वी होण्यासाठी प्रेरणा दिली.
. या यशामध्ये क्रीडा शिक्षक श्री. वैभव सोनवणे व श्री. कुणाल देवरे यांचे मोलाचे योगदान राहिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले.
. तसेच समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.
. हा विजय म्हणजे केवळ शाळेसाठी नव्हे तर संपूर्ण साक्री तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.