प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिनाचा उत्सव
दहावीचे विद्यार्थी बनले शिक्षक
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, साक्री येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंप्रती आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करत अविस्मरणीय बनवला. या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली. त्यांनी नर्सरी ते नववीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवून जबाबदारी, शिस्त आणि अध्यापनाची खरी जाणीव अनुभवली. विद्यार्थ्यांनी घेतलेले तास खऱ्या शिक्षकांसारखेच शिस्तबद्ध व आकर्षक झाले. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना नवीन अनुभव तर मिळालाच, पण शिक्षकांच्या परिश्रमांची जाणीवही प्रकर्षाने पटली. कार्यक्रमाचे इन्चार्ज
श्री भुपेंद्र साळुंके व सौ. वैशाली खैरनार यांनी उत्तम कामगिरी बजावली.
इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी उत्तम असे सूत्रसंचालन केले. चेअरमन सरांचे संबोधन या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रशांत पाटील सर यांनी सर्व शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व आपल्या संबोधनात म्हटले की, “शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील खरा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देण्याचे आणि समाज घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षक करतात. आज दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा रोल करून त्यांच्या परिश्रमांची जाणीव घेतली, हीच शिक्षक दिनाची खरी शिकवण आहे. प्रचितीचे शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव तत्पर असतात, याचा मला अभिमान आहे.
”कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच समन्वयक श्री. वैभव सोनवणे आणि श्री. तुषार देवरे यांनीही विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत उत्तम मार्गदर्शन केले. डेकोरेशन टीम नेही उत्तम अशी सजावट केलेली होती. सविता लाडे यांनी विद्यार्थिनींच्या मदतीने सुंदर अशी रांगोळी रेखाटली होती.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि चेअरमन सरांचे आशीर्वचन यामुळे शाळेत आनंदाचे, कृतज्ञतेचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.