प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये
गणपती विसर्जन सोहळा
भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला
साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये दहा दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत भक्तिभाव, परंपरा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत दररोज सकाळी प्रत्येक वर्गाकडून गणरायाची पूजा होत असे. दुपारी प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांकडून आरती केली जात असे, तर संध्याकाळी शिक्षकवर्ग ड्रायव्हर बंधू मिळून सामूहिक आरतीचा सोहळा साजरा करत असे.
बाप्पांना दररोज वेगवेगळ्या नैवेद्यांचा प्रसाद अर्पण करण्यात आला. विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचे विशेष आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. घरगुती गणपती सजावट स्पर्धा हा या उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इन्चार्ज श्री. कुणाल देवरे व सौ. नीतू पंजाबी यांनी काटेकोरपणे लक्ष देत सर्व परंपरा साजऱ्या केल्या. डेकोरेशन टीममधील भूपेंद्र साळुंखे, पियुष बागुल, दीपमाला अहिरराव व वैष्णवी देवरे यांनी अप्रतिम सजावट करून बाप्पांच्या मूर्तीस अधिक आकर्षक रूप दिले. दररोज सविता लाडे व प्रियंका पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने मनमोहक व विविधरंगी रांगोळ्या साकारून वातावरण मंगलमय केले.
स्वतः चेअरमन सरांनी विसर्जन मिरवणुकीच्या वेळी उपस्थित राहून बाप्पाच्या गाण्यांवर ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटला. प्राचार्य सौ. वैशाली लाडे यांचे मार्गदर्शन तसेच समन्वयक श्री. वैभव सोनवणे व श्री. तुषार देवरे यांचे योगदान यामुळे हा गणेशोत्सव अधिक सुंदर आणि अविस्मरणीय ठरला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आरती म्हणण्यापासून ते विद्यार्थ्यांना प्रसाद वाटेपर्यंत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ड्रायव्हर बंधू मावशी या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले. यावेळी ड्रायव्हर बंधूंचीही उपस्थिती लाभली आणि त्यांनी देखील उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवत वातावरण अधिक उत्साही केले.
सौ. गीतांजली देवरे सपना ठाकरे श्री. श्रावण अहिरे यांनी लेझीम नृत्य अविष्कार सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढविली. गणपती बाप्पाला निरोप देताना सर्वांच्याच मने भरून आली व गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत सर्वांनी बाप्पाला जड अंतकरणाने निरोप दिला.