प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रचिती पब्लिक स्कूलचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन इन्चार्ज शीतल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर पद्धतीने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या अनिता पाटील मॅडम आणि समन्वयक राहुल अहिरे सर यांच्या हस्ते गुरुपूजनाने करण्यात आली. यावेळी अनिता पाटील मॅडम व राहुल अहिरे सर यांनी जीवनात गुरुचं महत्व भाषणातून पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पर्व खैरनार आणि आयुष पाटील यांनी केले, त्यांना किरण देवरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या सजावटीमध्ये रांगोळीची जबाबदारी सरिता मॅडम आणि सुनीता मॅडम यांनी, तर बोर्ड सजावटीची जबाबदारी प्रेरणा मॅडम आणि सायली मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली. आकर्षक बॅनर व सजावटीसाठी अर्चना मॅडम, निकाळे मॅडम, आरती मॅडम, मयुरी मॅडम, पवार सर, प्रसाद सर, अभिषेक सर, दिव्या मॅडम आणि जागृती मॅडम यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचे व्हिडिओ व फोटोग्राफीचे काम निखिल सर यांनी केले. शितल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरू- शिष्य या संकल्पनेवर आधारित सुंदर सादरीकरण करण्यात आले. अश्विनी पगार मॅडम यांनी केलेल्या भाषणातून गुरूंचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणातून गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात इयत्ता दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी जागृती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नाटिका, तर इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी सुनीता मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर नृत्य सादर केले. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी अश्विनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मनमोहक गीत सादर केले. पाचवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गुरुवंदनेने कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि भक्तिमय वातावरण प्राप्त झाले. या सुंदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी विद्यार्थी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी अभिषेक सर यांनी आभार प्रदर्शन करून सर्व मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व, गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणारा हा कार्यक्रम सर्वांच्या स्मरणात राहील असा उत्साहात संपन्न झाला.






















