पिंपळनेर: प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन आदरणीय प्रशांत पाटील साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन अश्विनी पगार मॅडम यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. देशभक्तीचा जयघोष, तिरंग्याची पताका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रंगतदार सादरीकरणामुळे शाळेतील संपूर्ण परिसर भारावून गेला. सकाळच्या ताज्या गारव्यात शाळेच्या प्रांगणात देशभक्तीपर गाणी, आणि विद्यार्थ्यांच्या आनंदी चेहऱ्यांनी वातावरण भरून गेले होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल अहिरे सर आणि मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे भारतीय सेनेतील जवान सेवानिवृत्त श्री. सूर्यकांत अहिरे सर यांचे औक्षण करून टाळ्यांच्या गजरात करण्यात आले. देशसेवेची प्रेरणा मनात बाळगून श्री. सूर्यकांत आहिरे सर यांनी २० जुलै २००० रोजी भारतीय सैन्यात प्रवेश केला. सन २००० ते २००१ या कालावधीत त्यांनी पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी विविध महत्त्वाच्या ठिकाणी कर्तव्य बजावले. २००१ ते २००३ – चंदीगड, २००३ ते २००७ – कोलकाता, २००७ ते २००९ – जम्मू-काश्मीर, तर २०१० ते २०१६ – गुवाहाटी येथे त्यांनी सेवा बजावली. या सेवाकाळात चंदीगड, पंजाब, जम्मू-काश्मीर, आसाम आणि पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांमध्ये त्यांनी आपल्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडली. देशसेवेप्रती निष्ठा, शिस्त, धैर्य आणि समर्पण या मूल्यांना आपल्या जीवनात सर्वोच्च स्थान देत त्यांनी अनेक वर्षे मातृभूमीच्या सुरक्षेसाठी योगदान दिले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी त्यांना ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सन्मानपूर्वक निवृत्ती मिळाली. मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेला शिस्तबद्ध व आकर्षक मार्चपास हा सोहळ्याचा पहिला खास आकर्षण ठरला.नर्सरी ते चौथीपर्यंतच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील महान नेत्यांचे रूप धारण करून सर्वांचे मन जिंकले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. तिरंगा उंचावताच ‘भारतमाता की जय’, ‘जय जवान जय किसान’ आणि ‘वंदे मातरम्’ चा जयघोष परिसरात घुमला. राष्ट्रगीताच्या स्वरांनी संपूर्ण वातावरण देशप्रेमाच्या भावनेने भरले. राष्ट्रगीताला आज दीडशे वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर महाराष्ट्राची ओळख सांगणारे हृदयाला स्पर्श करणारे “महाराष्ट्र गीत”, ध्वजगीत विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी घोषवाक्य सादर केले त्यांना किरण मॅडम यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत सादर केले त्यांना मार्गदर्शन मयुरी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद सर यांनी केले. इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांनी सर्व उपस्थितांचे मन जिंकले. या सादरीकरणांमधून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील शौर्यकथा, स्वातंत्र्य सेनानींचे त्याग आणि आजच्या पिढीची जबाबदारी यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. यानंतर मोरे सर यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती सांगितली. शाळेच्या प्राचार्य अनिता पाटील मॅडम यांचे प्रेरणादायी विचार, शाळेचे समन्वयक राहुल अहिरे सर यांचे उत्साहवर्धक शब्द आणि प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना देश सेवा , शिस्त व परिश्रमाचे महत्त्व पटवून दिले.
इयत्ता 5वी व 6वीतिल विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर केले त्यांना मार्गदर्शन जागृती मॅडम व सरिता मॅडम यांनी केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती वर आधारित नाटक सादर केले त्यांना सायली मॅडम व प्रेरणा मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या प्रस्तुतीला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी सरिता मॅडम, निकाळे मॅडम , शितल मॅडम आणि दिव्या मॅडम यांनी काढली. फलक लेखन पवार सर यांनी केले. आजच्या कार्यक्रमाच्या बॅनर सजावटीची जबाबदारी अर्चना मॅडम, सायली मॅडम, शीतल मॅडम , आरती मॅडम , प्रेरणा मॅडम , सुनीता मॅडम , मोरे सर , प्रसाद सर , निखिल सर , किरण मॅडम , जागृती मॅडम , पवार सर , दिव्या मॅडम यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली. कार्यक्रमाचे छायाचित्र निखिल सर आणि चित्रफित जागृती मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सुनीता मॅडम यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या क्राफ्ट स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यात विद्यार्थ्यांच्या तिरंगा रंगातील चित्रकला, हस्तकला आणि शैक्षणिक प्रकल्पांचे आकर्षक सादरीकरण झाले. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी तंबाखू मुक्त भारत शपथ आणि प्रतिज्ञा घेण्यात आली .तसेच सर्व विद्यार्थ्यांना लाडू व बिस्किट्सचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. या यशस्वी कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद , विद्यार्थी , शिक्षकेतर कर्मचारी व ड्रायव्हर बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले.























