पिंपळनेर:-प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे “Blue Day” आणि “Rainy Day” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन श्री प्रशांत भीमराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन इन्चार्ज दिव्या जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर पद्धतीने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य अनिता पाटील मॅडम आणि समन्वयक राहुल अहिरे सर यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. Blue Day हा विद्यार्थ्यांना निळा रंग ओळखता यावा आणि त्याच्याशी संबंधित वस्तूंची माहिती मिळावी यासाठी साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. शाळेत निळ्या रंगाच्या वस्तू, फुले, खेळणी किंवा चित्रे दाखवून विद्यार्थ्यांना रंगाची ओळख करून दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे निरीक्षण कौशल्य, रंग ओळख आणि सर्जनशीलता वाढण्यास मदत होते तसेच शाळेत रेनी डे विद्यार्थ्यांना पावसाळा, पाऊस आणि निसर्गातील बदल यांची आनंददायी पद्धतीने ओळख करून देण्यासाठी साजरा केला जातो अशाप्रकाची माहिती सीमा निकाळे मॅडम यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा नांद्रे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या सजावटीमध्ये रांगोळीची जबाबदारी अर्चना मॅडम आणि आरती मॅडम यांनी तर बॅनर सजावटीसाठी सायली मॅडम,जागृती मॅडम,अश्विनी मॅडम, सरिता मॅडम, किरण मॅडम सुनीता मॅडम, निखिल सर,पवार सर यांनी उत्कृष्टरित्या जबाबदारी पार पाडली. बोर्ड सजावटीची जबाबदारी प्रसाद सर आणि मोरे सर यांनी पार पाडली.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना निळ्या रंगाची ओळख करून देणे तसेच पावसाळ्याशी संबंधित विविध गोष्टींची माहिती आनंददायी पद्धतीने देणे हा होता. कार्यक्रमासाठी शाळेची सुंदर सजावट ढग, इंद्रधनुष्य, पावसाचे थेंब, छत्री, रेनकोट, मशरूम, निळी फुले व माशांच्या प्रतिकृतींनी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी निळ्या रंगाचे पोशाख परिधान करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे एलकेजीच्या विद्यार्थिनींनी शितल शिंपी आणि निकाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असा पावसावर डान्स करून सर्वांची मने जिंकली. त्यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने आणि आनंदाने भरून गेले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना Blue Colour, Clouds, Fish आणि Rainbow यांची माहिती देण्यात आली. तसेच Rain Drop, Umbrella आणि Raincoat यांचे महत्त्व सीमा निकाले मॅडम यांनी दिली. कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ निखिल सर यांनी काढले. प्रेरणा मॅडम यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या सुंदर आणि आनंददायी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खेळातून आणि कृतीतून शिकण्याचा अनुभव मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रेरणा मॅडम यांनी आभार प्रदर्शन करण्यात आले. या सुंदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी विद्यार्थी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमाच्या शेवटी प्रेरणा मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून सर्व मान्यवर शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.



















