पिंपळनेर – प्रचिती पब्लिक स्कूल यांच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून भक्तिमय आणि सांस्कृतिक वारी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वारीत शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत, टाळ-मृदंग हाती घेत सहभाग घेतला.या विशेष कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन आदरणीय प्रशांत पाटील साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन प्रचिती पब्लिक स्कूलच्या शिक्षका सरिता अहिरे व मयुरी सोनार यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. “आस विठुरायाची दर्शनाची माझा विठ्ठल माझी वारी भक्तीचा लौकिक सोहळा” विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाखात सहभागी होत वारकऱ्यांप्रमाणे टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत दिंडी काढली.या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर आणि मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, चालक-मालक बंधू यांनी देखील सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आजच्या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत असलेले विद्यार्थी तसेच संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मुक्ताबाई वेशभूषा परिधान करून आलेले विद्यार्थी आकर्षक ठरले तसेच आजच्या या आषाढी एकादशी निमित्त सामोडे या गावात दिंडी काढण्यात आली सुंदर अशी पालखीचे सजावट करण्यात आले. गावकऱ्यांनी विविध प्रकारच्या व सुंदर रांगोळ्या काढून विद्यार्थ्यांच्या वारीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. रंगीबेरंगी विठ्ठल-रुक्मिणीच्या रांगोळ्या आणि विद्यार्थ्यांनी झिम्मा फुगडी खेळत उत्साह दर्शविला. विद्यार्थ्यांच्या या झिम्मा फुगडी चा गजर वारीचे खास आकर्षण ठरले.गावातील भजनी मंडळ यांनीही आपला सहभाग नोंदविला आणि त्यांच्या सुंदर अशा भजनामुळे कार्यक्रमाची शोभा दुपटीने वाढली. टाळ-मृदंगाच्या नादात, भजन-कीर्तनाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला.विद्यार्थ्यांनी रिंगण धरत पालखी भोवती विठ्ठलाचा जयघोष केला.भजनी मंडळांनी विठ्ठलाची गाणी गाऊन वातावरण आनंदी केले विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचा जयघोष करत आपली वारी पूर्ण केली तसेच आजच्या भजनी मंडळातील उत्तम पाटील, भटू नंदन,किसन पाटील,शुभम घरटे,अंकुश घरटे, बबलू नंदन, संतोष पाटील, पांढरीनाथ घरटे या सर्वांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. सरपंच व गावकऱ्यांनी सहभाग घेऊन आनंद द्विगुणीत केला विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले त्यासाठी मार्गदर्शन मोरे सर यांनी केले.तसेच टाळ नृत्यही सादर केले त्यासाठी मार्गदर्शन सायली मॅम यांनी केले.किरण मॅडम यांनी आषाढी एकादशी निमित्त माहिती सांगितली.तसेच सूंदर अशी रांगोळी दिव्या, शितल, प्रेरणा मॅम यांनी रेखाटली. तसेच सुंदर असे फलक लेखन निखिल सर, प्रसाद सर,मोरे सरानी केले. अर्चना मॅम , अश्विनीमॅम , स्मिता मॅम , सुनीता मॅम , आरती मॅम यांनी घोष वाक्य बॅनर तयार केले.कार्यक्रमाचे छायाचित्रण निखिल सर , तर व्हिडिओ चित्रीकरण प्रसाद सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी व ड्रायव्हर बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

















