साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंची राज्यस्तरीय तेंग-सु-डो क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी नाशिक विभागस्तरावर झालेल्या १९ वर्ष वयोगटातील स्पर्धेत वजन गट ५९ शुभदा अरुण बच्छाव (प्रथम), तर १९ वर्ष वयोगट मुली – (वजन ४८)मध्ये गायत्री अंकुश साळुंखे (द्वितीय) हिने यश मिळविले. या दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरावर होणाऱ्या तेंग-सु-डो शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. स्कूलचे अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील मार्गदर्शनाखाली शिक्षकांकडून मिळणारे योग्य प्रशिक्षणाचा स्पर्धेसाठी फायदा होत आहे. राज्यस्तरावर यशस्वी कामगीरी करून राष्ट्रीय पदक मिळविणार असल्याचे मत यावेळी खेळाडूंनी व्यक्त केले.
या यशस्वी खेळाडूंचे शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.