पिंपरी :-पिंपरी विधानसभा मतदार संघ, सुनिल वाघमारे, मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती sveep कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहेत. सन २०१९ चे विधानसभा निवडणुक मतदान टक्केवारी वाढविणेसाठी तसेच लोकशाही समृद्ध व बळकट करणेकरीता मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणेसाठी तसेच १००% मतदारांनी मतदान करणेकरीता निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत.
त्याचाच भाग म्हणुन (दि. २) बुधवार रोजी स. ७.३० वाजता आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे जेष्ठ नागरीक संघ, डी. वाय. पाटील महाविद्यालय विद्यार्थी, टेल्को कामगार, तसेच विविध संघटना मार्फत स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात आला त्या कार्यक्रमाकरीता ५००० पेक्षा जास्त स्वयंसेवक उपस्थितीत होते. त्यांना मतदान जागृतीकरणे करीता आवाहन करुन मतदानाची शपथ देण्यात आली. त्यानंतर मतदान करणेबाबत शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली
यावेळी सुनिल वाघमारे, मतदार नोंदणी अधिकारी, डॉ. अनिल रॉय आरोग्य वैद्यकीय अधिकारी, श्री. संदीप खोत सहा. निवडणुक निर्णय अधिकारी, श्रीम. आशाताई दुरगुडे क्षेञीय अधिकारी अ क्षेञीय कार्यालय तसेच २०६ पिंपरी विधानसभा मतदार संघातील sveep कक्षाचे मुकेश कोळप, तानाजी सावंत, सुशांत जोशी हे उपस्थित होते, अशी माहिती २०६ (अ.जा.) पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी दिली आहे.