पिंपरी : भोसरी येथील मल्टीस्पेशेलिटी अत्याधुनिक, अद्यावत तंत्रज्ञानाने सुसज्ज ओम हॉस्पिटल व लायन्स क्लब तळवडे प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ह्दयरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर संपुर्ण एक महिना चालणार आहे, अशी माहिती ओम हॉस्पिटल चे संचालक डॉ. सुनिल अगरवाल यांनी दिली.

डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले की, एका सर्वेनुसार भारतात दरवर्षी अंदाजे ७ लाख ५० हजार व्यक्तींचा मृत्यू हद्यरोगाने होतो. त्यामुळे योग्य वेळी हृदयरोगाचे निदान होणे आवश्यक आहे. स्वास्थ भारत, सक्षक्त भारत, निरोगी व रोगमुक्त पुणे शहर ही संकल्पना समोर ठेवून हे शिबिर १० नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१९ दरम्यान रोज सकाळी १० ते ४ या वेळेत ओम हॉस्पिटल हुतात्मा चौक, आळंदी रोड भोसरी येथे आोजित केले आहे.

या शिबिरात ह्दयरोग तपासणी अंर्तगत इ.सी.जी., स्ट्रेस टेस्ट, २ डी इको फक्त ९९९ रुपयात करण्यात येणार आहे. तसेच अ‍ॅन्जिओग्राफी ५००० रुपये, अ‍ॅन्जिओप्लास्टी ६०,००० रुपये आणि बायपास शस्त्रक्रिया १,५०,००० रुपयात करण्यात येणार आहे. जर रूग्णांकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल तर हे सर्व तपासणी आणि उपचार, शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन डॉ. सुनिल अगरवाल यांनी केले आहे. अधिक माहिती साठी किंवा रजिस्टे्रशन साठी 91303219766/ 8888825603/7774049691 वर संपर्क करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here