पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील बो-हाडेवाडी, जाधववाडी, चिखली गावांच्या नगर रचना योजनेस महापौरांनी विरोध दर्शविला आहे.
विकास योजना प्रस्तांवाची अंमलबजावणी करणे हा नगररचना योजना तयार करण्याचा मुख्य उद्देश असतो. प्रभाग क्र. २ बो-हाडेवाडी, जाधववाडी, चिखली या गावातील सर्व नागरिक, शेतक-यांच्या शिष्टमंडळाने महापौर राहुल जाधव यांची समक्ष भेट घेऊन प्रस्तावित नगर रचना योजनेस तीव्र विरोध दर्शविला.
बो-हाडेवाडी, जाधववाडी, चिखली भागातील सर्व गट क्रमांकामधील शेतक-यांचा नगर रचना योजना (TP Scheme) राबविण्यास असलेला विरोध लक्षात घेऊन सदर भाग हा नगर रचना योजनेतून वगळण्यात यावा. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच नगररचना योजना राबविण्याच्या सूचना महापौर राहूल जाधव यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.