मुंबई : शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार असं समजत असतानाच, आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशातच अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला शरद पवारांचा पाठिंबा आहे का?, याबाबत चर्चा सुरु होत्या. शरद पवारांच्या एका ट्वीटनंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवारांनी ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ”अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.”
अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही : शरद पवार






















