पिंपरी : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड भाजपने आज आंदोलन केले. ‘राहुल गांधी माफी मांगो’, ‘राहुल गांधी माफी मांगो’, ‘राहुल गांधींचे करायचे काय, खाली डोकेवर पाय’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात महापौर माई ढोरे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, महिला प्रदेश सचिव उमा खापरे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक बाबू नायर, केशव घोळवे, मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस अमोल थोरात, नगरसेविका शारदा सोनवणे, शैलजा मोरे, अनुराधा गोरखे, महिला अध्यक्षा शैला मोळक, राजू दुर्गे, नंदू भोगले, अजय पाताडे, वीणा सोनवलकर, आशा काळे आदी सहभागी झाले होते.
‘आम्ही सावरकर विचार वादी’, ‘राहुल गांधी यांचा जाहिर निषेध, जाहिर निषेध’, ‘राहुल गांधी यांच्या विधानाचा धिक्कार असो’, ‘राहुल गांधी माफी मांगो’, ‘राहुल गांधी माफी मांगो’, ‘राहुल गांधींचे करायचे काय, खाली डोके वर पाय’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.