पिंपरी : उद्योग क्षेत्राला तांत्रिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे व या मनुष्यबळाला सक्षम रोजगार मिळावा यासाठी उद्योगक्षेत्र व शिक्षण संस्थांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जा असणाऱ्या कंपनीतील अनुभव मिळावा व त्या अनुभवावर रोजगार मिळावा, यासाठी आयटी क्षेत्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपनी कॅपजेमिनी व अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील नामवंत शिक्षण संस्था पीसीसीओई यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. यावेळी कॅपजेमिनी कंपनीचे विवेक जैन, कमलेश देकाते, जगदीश कुंचम, पुनीत कुमरा, नीरज कापरे, रश्मी बापट, पीसीईटीचे संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रा. डॉ. एन. बी. चोपडे, अधिष्ठाता डॉ. संजय लकडे, सर्व विभाग प्रमुख व महाविद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
अभियंत्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार…
पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) भारतातील उत्तम दर्जाचे अभियंते घडविणाऱ्या निवडक शिक्षण संस्थांबरोबरच कॅपेजेमिनी कंपनीने असे करार केले आहेत. या करारांतर्गत Embeded ,VLSI या इलेक्ट्रॉनीक्स टेलीकम्युनिकेशनमधील उपयुक्त तंत्रज्ञानावर भविष्यात मोठया प्रमाणावर अभियंत्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कॅपजेमिनी कंपनीचे उपाध्यक्ष प्रसाद शेटे यांनी दिली. मशीन लर्नीग, आर्टिफिशिल इंटेलिजन्स, ऑटोमेशन यासारख्या तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिकांवर आधारित अनुभव मिळावा तसेच या विषयातील प्रगत ज्ञान विद्यार्यांना मिळाले तर त्याचा करिअर घडविण्यासाठी उपयोग होईल, असे कॅपजेमिनीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख जगदीश कूंचम यांनी यावेळी सांगितले.
देश-विदेशातून उपलब्ध होणार रोजगार…
पीटीईटी संस्था ही विध्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या रोजगार संधी देण्यासाठी सदैव कटीबद्ध आहे. सुमारे 32 लाख रुपयांपर्यंत वार्षिक पगाराच्या देश विदेशातील उत्तम रोजगाराच्या संधी नियमित उपलब्ध करून देण्यात आमची संस्था यशस्वी ठरली आहे. आतापर्यंत पीसीईटीच्यावतीने सुमारे 22 हजारांहून जास्त अभियंत्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी संस्था यशस्वी झाली आहे. या सामंजस्य कराराची पूर्तता करण्यासाठी संस्थेतर्फ सर्वतोपरी प्रयत्न केले जातील व हा करार पीसीईटीच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहीला जाईल, असे पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी यांनी सांगितले. पीसीसीओईतील अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षातच विद्यार्थ्यांना कॅपजेमिनीतर्फे भविष्यात उपयुक्त तंत्रज्ञान शिकवण्यात येईल तसेच त्यांना त्याच तंत्रज्ञानावर कंपनीत इंटर्नशिप व प्रोजेक्ट व त्यानंतर नोकरीची संधी देण्यात येणार असल्याची माहिती कॅपजेमिनीच्या HR विभागाचे संचालक श्री. पुनीत कुमरा यांनी याप्रसंगी दिली. आर्या सिंग यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. या महत्वपूर्ण अशा करारासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, कोषाध्यक्ष एस डी गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच विश्वस्त भाईजान काझी यांनी मार्गदर्शन केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस. डी. गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला. स्वागत व प्रस्ताविक ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांनी, सुत्रसंचालन आर्यासिंग यांनी केले.