पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वीकृत सदस्य माऊली थोरात, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, मंगेश चितळे, नगरसचिव उल्हास जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, परिट सेवामंडळाचे उपाध्यक्ष गजानन गवळी, सामाजीक कार्यकर्ते संतोष भालेकर, दिलीप शिंदे, नरेश कदम, सुनिल अभंग, किरण लोंढे, अनिल जाधव, किशोर रोकडे, प्रशांत दळवी, राम शिंदे, जयश अभंग, दया अभंग, वैशाली राऊत, सपना अभंग, सुमन अभंग आदी उपस्थित होते.