पिंपळनेर – प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिंगलबेल या गितावर नृत्य करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात एकच रंगत आणली.
तसेच, सांताच्या हातून केक कापून विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळी, प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे यांच्यासह स्कूलचे शिक्षक-वर्ग उपस्थित होते.
दरम्यान, मेनबत्ती पेटवून येशू ख्रिस्तांना प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर, सांताच्या वेशभूषेत आश्विनी मोरे व कार्तिक सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन ज्योती खैरनार यांनी केले. रांगोळीतून सांताचे चित्र रेखाटण्यात आले. या उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देसले यांनी केले.