प्रचिती प्री प्रायमरी स्कूल, प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा
साक्री – विद्यार्थ्यांमध्ये असलेली इच्छाशक्ती, उत्साह आणि मेहनत यामुळे शालेय जीवनात प्रगती साधता येते. त्याचप्रमाणे अंगी शिस्त बानल्यास खेळामध्ये देखील प्रगती साधता येत असल्याचे प्रतिपादन क्रीडा शिक्षक धनंजय घरटे यांनी केले. साक्री येथील प्रचिती प्री- प्रायमरी आणि प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी स्कूलच्या प्रांगणात क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी, क्रीडा शिक्षक अशोक सोनवणे, प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. तद्नंतर विद्यार्थीनींनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. तसेच, विद्यार्थ्यांनी रेड हाऊस, ब्लु हाऊस, ग्रीन हाऊस, येलो हाऊस प्रमाणे परेड संचलन सादर केले. मशाल पेटवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी, विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रतिज्ञा केली.
क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळ घेण्यात आले. यामध्ये – नर्सरी – रनिंग, बॉल बॅलन्सींग, संगीत खुर्ची. एलकेजी – रनिंग, बेडुक उड्या, पाण्याची बॉटल भरणे.युकेजी – रनिंग, गोणपाट शर्यत, लिंबु चमचा, अशा स्पर्धा घेण्यात आल्या.
कबड्डी, रेडी फॉर स्कुल, सुई दोरा, बुक बॅलन्सींग, तीन पायाची शर्यत, बॉल टप्पा असे खेळ घेण्यात आले. त्यानंतर वर्गानुसार क्रमांक काढण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इ.९ तील विद्यार्थीनी मोक्षा टाटीया, मृणाल देव यांनी केले. स्पर्धेचे संयोजन शिक्षक नितीन राजपुत, मनोज वाघ, प्रिती लाडे यांनी केले. आभार मंगेश बेडसे यांनी मानले.