Chaupher News
पिंपळनेर येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी ( दि. १८ ) आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. मेळाव्यात विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रचिती पब्लिक स्कूलचे संस्थापक प्रशांत पाटील, कविता पाटील, प्रीती पोपली, एस. व्ही. नंदन उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर प्रशांत पाटील यांचा सत्कार समन्वयक राहुल अहिरे यांनी केला. तर कविता पाटील यांचा सत्कार प्राचार्या वैशाली लाडे यांनी तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रीती पोपली व एस. व्ही. नंदन यांचा सत्कार सेक्रेटरी कविता पाटील यांनी केला.
कार्यक्रमात ज्योती खैरनार, शामल बच्छाव व अस्विनी मोरे यांनी आकर्षक रांगोळी रेखाटली. तर शिक्षिका अर्चना देसले यांनी फलक लेखन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षतेत्तर कर्मचाऱ्यांची सहकार्य केले.