साक्रीतील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये कविता गायन स्पर्धा
साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या रेड, ब्ल्यू, ग्रीन, यलो हाऊसमधील विद्यार्थ्यांनी कविता गायन स्पर्धेत सहभाग घेतला. गायनातून या वेळी विद्यार्थ्यांनी कवितेचे भावविश्व जाणून घेतले.
कविता गायनाने मन आनंदी होते. विद्यार्थ्यांना अभ्यासातून आलेला थकवा किंवा कंटाळवाणापणा नाहीसा होतो. कविता म्हणजे आपले आपले विचार अलंकारीक भाषेत व्यक्त करणे. कवितेतून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, निसर्गसौंदर्यता निसर्गाचे सान्निध्य, कविता गाण्यांची लकब, सुर, ताल, लय आदींची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी या दृष्टीकोनातून कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कविता गायनासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी व हाऊस मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्कूलचे मुख्याध्यापक अतुल देव, संदीप वाडेकर, निलेश माळीचकर निरीक्षक म्हणून लाभले. अतुल देव यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. काव्यरचना सोप्या सुटसुटीत लयबध्द व शब्दांच्या ओवीतून त्याचे निवेदन विलक्षण वेग घेतांना दिसून येते. कवितेतून कवी आपले विचार अलंकारिक भाषेत व्यक्त करतो, असे देव यांनी या वेळी सांगितले.
महेश ठाकरे यांनी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांवर व शिक्षकांवर आधारित अतिशय उत्कृष्ट पध्दतीने कविता सादर केली. या कार्यक्रमासाठी शाळेचे व्यवस्थापक तुषार देवरे व सर्व शिक्षकवृंद व इतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले. मंगेश बेडसे यांनी मुख्य संयोजन केले. मृदुल चौधरी आणि दर्शना कांकरिया या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेतील विजयी विद्यार्थी पुढील प्रमाणे :
इयत्ता पहिली ते तिसरी गट : निधी पाटील – रेड हाऊस प्रथम क्रमांक, अर्पित पाटील – ग्रीन हाऊस द्वितीय क्रमांक, हरिश्वर पाटील – येलो हाऊस तृतीय क्रमांक, इयत्ता चौथी ते आठवी गट : हेमांगी शिंदे – रेड हाऊस प्रथम क्रमांक, लुब्धा देसले – येलो हाऊस द्वितीय क्रमांक, पूर्वा पाटील – ग्रीन हाऊस तृतीय क्रमांक.