Chaupher News
पिंपरी : बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नेहरुनगर रस्त्याचे गांधीनगर झोपडपट्टीच्या बाजूने रुंदीकरण करण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नियोजन केले आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गांधीनगर परिसरातील बाधित नागरिकांनी माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 28) महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी नेहरुनगर रस्त्याचे फेर सर्व्हेक्षण करण्याची मागणी करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधीनगर झोपडपट्टीचे तीस वर्षांपूर्वी सर्व्हेक्षण झाले होते. त्याच आधारे आता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नेहरुनगर रस्त्याचे गांधीनगर झोपडपट्टीच्या बाजूने रुंदीकरण करण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नियोजन केले आहे. रस्त्याचे हे रुंदीकरण म्हणजे याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून रहात असणा-या गोरगरिब नागरिकांवर अन्यायकारक आहे, असे डॉ. कैलास कदम सांगितले.
कदम यावेळी म्हणाले की, गांधीनगर झोपडपट्टीच्या समोर उच्चभ्रू नागरिकांची सोसायटी आहे. रस्ता रुंदीकरण त्या बाजूने व्हावे. विकासकामांना आमचा विरोध नाही पंरतू बाधित नागरिकांचे आहे त्याच परिसरात पुर्नवसन करावे. अशी नागरिकांची मागणी आहे. तसे निवेदन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम आणि शिष्ठमंडळाने दिले.