Chaupher News
साक्री :
साक्री : समाजात सध्या भेडसावत असलेल्या समस्या, जुने खेळ व आठवणी अशा विविध प्रबोधनात्मक विषयांवर प्रचिती प्रि. प्रायमरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी सादर केलेली नृत्ये पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.. तसेच मोबाईलमुळे मुलांकडे दुर्लक्ष करत असलेल्या पालकांना नृत्यातून बालपणात घेऊन गेले. साक्री (जि. धुळे ) येथे प्रचिती प्रि. प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील, आई एकविरा फौंडेशनच्या सेक्रेटरी कविता पाटील, प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रागिणी येवले, नीता ठाकरे, रुपाली ठाकरे, धनश्री सिसोदे, सरला सोनवणे, गायत्री शेवाळे, शितल नांद्रे, रिना भामरे, ज्योती जाधव, गायत्री काकुस्ते, अर्चना पाटील, ललिता अहिरे, साधना कुवर, ज्योती देसले, योगिता चंद्रात्रे, दगडू मोरे, सुरेश मोरे यांची उपस्थिती होती.
स्नेहसंमेलनाची सुरुवात शिवाजी महाराज, नटराज व सरस्वती पूजनाने झाली. औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी साधना कुवर म्हणाल्या, प्रचिती प्रि. प्रायमरी स्कूलमध्ये नेहमी नवीन नवीन उपक्रम राबविले जातात. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. स्कूलच्या भव्य अशा आवारात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर खेळामध्ये पारंगत केले जाते. हे प्रचिती स्कूलचे वैशिष्ट्य असल्याचे त्या म्हणाल्या.
शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. ते म्हणाले, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे हे विद्यार्थ्यांचे पालक असतात. कारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत शिक्षकांबरोबर पालकांचीही भूमिका महत्वाची असते. तसेच नुकताच झालेल्या ‘पांझरा थंडी’ कार्यक्रमाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये महिला पालकांना नवीन उपक्रम राबविण्यास प्रवृत्त करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो. यावेळी त्यांनी वर्षभरात झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेऊन शाळेचे पुढील ध्येय व नवीन उपक्रमांची माहिती दिली.
गायत्री शेळके यांनी, प्राचार्या भरती पंजाबी यांच्या संकल्पनेतून शेवटच्या तासिकेत विद्यार्थ्यांना अडचणी येत असलेल्या विषयावर भर देऊन पुढे येण्यासाठी राबविलेल्या ‘रेमेडीअल’ या उपक्रमाचे कौतुक केले.
दरवर्षी प्रबोधनात्मक उपक्रम
शाळेतर्फे दरवर्षी स्रीभ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, महाराष्ट्राची लोकधारा, वृक्षारोपण, परिवर्तन अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जातात. यावर्षी भारती पंजाबी व वैभव सोनवणे यांच्या संकल्पनेतून ज्यांनी स्वप्नपूर्तीसाठी आलेल्या संकटांवर मात करून ध्येय गाठले, अशा व्यक्तींना सलामी देण्यासाठी ‘अम्बिशन’ ही थीम राबविण्यात आली.
शाळेतर्फे दरवर्षी स्रीभ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, महाराष्ट्राची लोकधारा, वृक्षारोपण, परिवर्तन अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जातात. यावर्षी भारती पंजाबी व वैभव सोनवणे यांच्या संकल्पनेतून ज्यांनी स्वप्नपूर्तीसाठी आलेल्या संकटांवर मात करून ध्येय गाठले, अशा व्यक्तींना सलामी देण्यासाठी ‘अम्बिशन’ ही थीम राबविण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘Say no to Plastic’ या नृत्यातून समाजात सध्या भेडसावत असलेल्या समस्येची जाणीव करून दिली, तर ‘यादों की बारात’ या नृत्यातून जुने खेळ व आठवणी जागविला. तसेच मोबाईलमुळे मुलांकडे दुर्लक्ष करत असलेल्या पालकांना पुन्हा एकदा नृत्यातून बालपणात घेऊन गेलेल्या नृत्यावर उपस्थित पालकांची व प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
कार्यक्रमाचे संयोजन स्मिता नेरकर व सुनीता पाटील यांनी केले. मंगेश बेडसे व मनीषा बोरसे यांच्यासह विद्यार्थिनी निहारिक बोरसे, हिमानी सूर्यवंशी, धैर्या शेवाळे, अर्निका राणे, प्रणव नेरे, जान्हवी देवरे, अर्णव पाटील यांनी केले. संमेलनात आकर्षक रांगोळी वृषाली सोनवणे, प्रीती लाडे, वैष्णवी थोरात यांनी रेखाटली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.