Chaupher News
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. मनोहर पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण हत्या करण्यात आली. कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथे अज्ञात हल्लेखोरांकडून हा हल्ला करण्यात आला. मनोहर पाटील पंचायत समितीचे माजी सभापती होते. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्रााथमिक अंदाज आहे. धक्कादायक म्हणजे चार दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती. यांच्या डोक्यात वार करून हल्लोखोरांनी पळ काढला होता. हे प्रकरण ताजं असतानाच अजून एक हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
मनोहर पाटील यांच्यावर बुधवारी संध्याकाळी हा हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शेतात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोहर पाटील यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी मिरज येथील मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.