पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार विषय समितींच्या अध्यक्ष पदावर निवड झाली असून यामध्ये विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण व क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदांची नावे पक्षनेत्या मंगला कदम यांनी जाहीर केली.
यामध्ये विधी समितीच्या अध्यक्षपदी मंदा आल्हाट, महिला व बालकल्याणसाठी अनुराधा गोफणे, शहर सुधारणासाठी प्रतिभा भालेराव तर क्रीडासाठी समीर मासूळकर यांना पुन्हा संधी देण्यात
आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सध्या अस्तित्वात असलेल्या नगरसेवकांची मुदत फेब्रुवारी 2017 ला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात कोणत्याही महत्त्वाच्या पदावरती काम करण्याची संधी न मिळालेल्या इच्छुकांना जाता-जाता मिळालेली संधी ही महत्त्वाची मानली जाते.
सदर विषय समितीच्या अध्यक्षांना उर्वरीत कालावधीमध्ये एक विधान परिषद व दुसरी महापालिका निवडणुकीची आचारसंहीता येत असल्याने धोरणात्मक निर्णयाबाबत प्रश्न निर्माण होणार आहे.
महापालिकेच्या विषय समिती अध्यक्षपदावर आल्हाट, गोफणे, मासूळकर, भालेराव यांची नियुक्ती
