Chaupher News
केरळमध्ये आढळलेले कोरोना संशयित रुग्ण बरे झाल्यानंतर देशवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाला घाबरु नका असं आवाहन केलं आहे. मात्र, उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसचे सहा तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एक संशयित रुग्ण आढळल्याने देशात खळबळ माजण्याची शक्यता आहे.
कालच दिल्लीत एक आणि तेलंगणमध्ये एक असे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ आज कोरोनाचा कहर देशभरात जाणवतो आहे. कोरोना व्हायरसचे सहा संशयित उत्तर प्रदेशात आढळले आहेत. एक संशयित नाशिकमध्ये आढळला आहे. या सहा रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.