Chaupher News
साक्री :राग, लोभ विसरून एकमेकांवर रंगांची उधळण करून साजरा केला जाणारा बंधुभावाचा संदेश देणारा सण म्हणजे होळी. संपूर्ण भारतात पुरातण
काळापासून हा सण साजरा केला जातो. साक्री येथील प्रचिती प्री. प्रायमरी व इंटरनॅश्नल स्कूलमध्ये होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील वाहनचालक सुभाष पाटील यांनी सहपत्नीक होळीची पूजा केली. होळी पूजनाच्या कार्यक्रमावेळी शाळेचे प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी,समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी शिक्षिका मनिषा बोरसे विद्यार्थ्यांना होळी विषयी माहिती देताना म्हणाल्या, होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळूनराख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशीअपेक्षा असते. या सणाच्या माध्यमातून सर्व धर्म समभावाची शिकवण मिळते. होळीच्याअग्नीत राग, द्वेष, अहंकार,वाईट गुणांचे दहन केले जाते.
























