चौफेरन्यूज – कोरोनामुळे थेरगाव व आजुबाजुच्या परिसरात अडकुन पडलेल्या विद्यार्थी आणि कामगार वर्गाला थेरगाव सोशल फाऊंडेशन तर्फे आज १८ दिवस अविरत अन्नदान सुरु आहे, TSF वर प्रेम कराणारे आमचे मित्र हिंतचिंतक जमेल तशी आम्हाला सर्वतोपरी मदत करत आहेत, सर्व TSF सदस्य जमेल तसा अन्नदानासाठी वेळ देत आहेत,
फुड कलेक्शन सेंटर वर खुप गर्दी होऊ नये म्हणुन सोशल_डिस्टन्सचे पांढरे वर्तुळ आखण्यात आलेले आहेत सर्व सभासद स्वतःहुन काळजी घेत आहेत, तसेच TSF सदस्यांनी आजही अपंग वयोवृध्द लोकांना त्यांच्या घरी जाऊन डबे पोहोचवले.