चौफेर न्यूज – मागील पाच दिवसांपासून पिंपरी चिंचवड परिसरात कोरनाचे रुग्ण आढळून येत आहे. रविवारी पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला आहे. 45 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मत्यू झाला आहे. या व्यक्तीवर पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी सायंकाळी या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड शहारमधील कोरोनाबाधितांची संख्या 31 झाली असून 12 जण बरे झाले आहेत. तर 18 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये 1 रुग्ण खडकी येथील असून बाकी तीन रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरात सध्या 15 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.