संचारबंदी असूनही आणि बाहेर पडू नका असे आवाहन करुनही सकाळी मॉर्निग वॉकला बाहेर पडणा-यांवर निगडी पोलिसांनी आज (शनिवारी) कारवाई केली आहे. मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका माजी महापौरांसह ३५ नागरिकांकडून परेड, सूर्यनमस्कार करुन घेतला. मी नियम मोडणार, अशी शपथ देत त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे.
भाजपमध्ये असलेले माजी महापौर आर. एस. कुमार यांच्यासह ३५ जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा निगडी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे वारंवार आवाहन केले आहे. मात्र, असे असतानाही नागरिक सकाळी मॉर्निग वॉकला घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे निगडी पोलिसांकडून कालपासून मॉर्निग वॉकला बाहेर पडणा-यांवर कारवाई सुरु केली आहे. आज देखील आकुर्डी परिसरात कारवाई करण्यात आली.