चौफेर न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात ५० दिवस लॉकडाऊन आहे. लोकांसमोर अन्न आणि पाणी यांचे संकट उभे आहे. असे असूनही, घरमालकाकडून भाडेकरूंचा छळ केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशाच एका प्रकरणात दिल्ली पोलिसांनी एका घरमालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीमध्ये एका भाडेकरूच्या तक्रारीवरून शाहदारा पोलिसांनी घरमालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन दरम्यान जबरदस्तीने भाडे देण्यास भाग पाडल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. सरकारने सध्या सुरु लॉकडाऊन दरम्यान भाडे वसूल न करण्याबाबतची मार्गदर्शक सुचना जाहीर केली होती. या घरमालकाविरुद्ध आयपीसीच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.