चौफेर न्यूज – राज्यातील विद्यार्थी यंदाही शाळेचा पहिला दिवस साजरा करतील; पण तो घरबसल्या. शाळेची घंटा डिजिटल वाजेल आणि नियमितपणे अध्यापन सुरू होईल. दोन महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा १५ जूनपासून सुरू करण्यात येणार आहेत. उच्च शिक्षणातील शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून सुरू होत असले तरी शालेय शैक्षणिक वर्ष मात्र नेहमीप्रमाणेच सुरू होणार आहे.
दूरदर्शन आणि आकाशवाणीद्वारे अध्यापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दूरदर्शनच्या दोन वाहिन्या आणि बारा तास मिळावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. नागपूर, परभणीमध्ये कम्युनिटी रेडिओद्वारे अध्ययनाचा प्रयत्न सुरू आहे. अन्यत्रही कम्युनिटी रेडिओ आणि स्थानिक केबलचा वापर करण्याचा विचार आहे.
शाळा करताहेत ही तयारी
- ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ची निर्मिती
- ॲप, सॉफ्टवेअरची पडताळणी
- शिक्षकांसाठी डिजिटल प्रशिक्षण
- विद्यार्थी-पालकांशी संवाद
- विषयानुसार पीपीटी, ध्वनीचित्रफित, ध्वनीफित