चौफेर न्यूज – कोरोनाचा शिक्षण क्षेत्राला फटका बसलेला असताना शिक्षण व्यवस्थेची समांतर व्यवस्था होऊ पाहत असलेल्या खासगी क्लासेसलाही बसला आहे. अद्यापही खासगी क्लासेस सुरू करण्यास राज्य शासनाची मान्यता दिलेली नाही. शाळांप्रमाणे खासगी क्लासेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची मागणी होत आहे.
कोरोनाची भीषणता
पाहून
काही
क्लासेस
चालकांनी
ऑनलाइनचा
पर्याय
निवडला.
त्याद्वारे
क्लासेस
सुरू
केले. मात्र,
ऑनलाइन
क्लासेसमुळे
क्लासचालकांना
किचिंत
दिलासा
मिळाला
आहे.
परंतु,
ऑनलाइन
क्लासेस
हा
पूरक
असून
तो
पर्याय
होऊ
शकत
नाही,
असे
क्लास
चालकांचे
म्हणणे
आहे.
क्लासेसमध्ये
बंद
असल्याने
ऑनलाइन
शिकवणीसाठीची
गुंतवणूक,
विद्यार्थ्यांकडून
शुल्क
मिळत
नसल्याने
हे
व्यावसायिक
जागेचे
भाडे,
वीज
बिल,
कर्मचाऱ्यांचे
पगार
व
अन्य
खर्च
भागवायचे
कसे
या
विवंचनेत
सापडले
आहेत.
एकाच
वेळी
शेकडो
विद्यार्थ्यांची
शिकवणी
घेणाऱ्यांसह
सर्वच
व्यावसायिक
करोनामुळे
मोठ्या
कोंडीत
सापडले
आहेत.
कोरोनामुळे विशेषत: एमएचटी-सीईटी, जेईई मेन, ऍडव्हान्स्ड, आयआयटी, एनआयटी या सारख्या प्रवेश परीक्षा घेणाऱ्या क्लासेस चालकांनी यापूर्वीच विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले आहेत. मात्र, नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणार आहे. जवळपास 20
ते 50
टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार नाहीत, अशी स्थिती आहे. तसेच ज्या पालकांनी शुल्क भरले नाही, ते करोनाच्या आर्थिक संकटामुळे शुल्क भरतील अशी चिन्हे नाहीत.