चौफेर न्यूज – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने यंदा नोव्हेंबरमध्ये आयोजित होणाऱ्या सीए परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सीए फाउंडेशन कोर्स न्यू स्कीम परीक्षा 9 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ग्रुप 1 च्या इंटरमिडिएट (आयपीसी) परीक्षा ओल्ड स्कीम परीक्षा 2 नोव्हेंबरपासून तर ग्रुप 2 मधील परीक्षा 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
आयसीएआयची सीए परीक्षा देशभरात एकूण 207 शहरांमधील परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. परदेशातही काही शहरांमध्ये या परीक्षेची केंद्रे आहेत. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. परीक्षा अर्ज 5 ते 25 ऑगस्ट या कालावधीत भरता येतील. वेबसाइट – icaiexam.icai.org
अशा होतील परीक्षा
सीए फाउंडेशन कोर्स परीक्षा – न्यू स्कीम – 9,11,15 आणि 17 नोव्हेंबर.
इंटरमिडिएट परीक्षा ओल्ड स्कीम ग्रुप 1- 2,4,6 आणि 8 नोव्हेंबर, ग्रुप 2 – 10,12,16 नोव्हेबंर.
इंटरमिडिएट परीक्षा न्यू स्कीम ग्रुप – 1 – 2,4,6 आणि 8 नोव्हेंबर, ग्रुप – 2 – 10, 12, 16 नोव्हेंबर.
फायनल कोर्स परीक्षा (ओल्ड आणि न्यू स्कीम)
ग्रुप-1 1,3, 5 आणि 7 नोव्हेंबर.
ग्रुप – 2 – 9, 11, 15, 17 नोव्हेंबर.
परीक्षेचे सविस्तर नोटिफिकेशन आणि वेळापत्रक icai-exams-nov-2020 वर पाहता येईल.