दीपावलीनिमित्त नाविन्यपूर्ण असा उपक्रम, प्रचिती प्री प्रायमरी स्कूल साक्री. या स्कूलने साक्री शहरातील आदिवासी वस्तीमधील मुलांना प्राचार्य भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते सुमारे 500 कपड्यांचे वाटप केले. तसेच दिवाळी फराळाचे वाटप व कपड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून येथील ग्रामस्थांची दिवाळी गोड करण्यात आली.
दिवाळीनिमित्त आदिवासी गरजू मूलांना सहकार्य हा उपक्रम पिंपळनेर परीसरातील मल्याचापाडा येथील आदिवासी भागात, प्राचार्य, व्यवस्थापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते आदिवासी मुलांना कपडे व फराळ वाटपाच्या उपक्रमाची अंमलबजवणी करण्यात आली. या उपक्रमामुळे या आदीवासी मुलांची दिवाळी गोड झाली. विविध उपक्रमांतून या मुलांना मदत करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.