साक्री : आई एकवीरा फाऊंडेशन संस्थेचे चेअरमन प्रशांत भीमराव पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अतुल देव यांच्या प्रेरणेतून प्रचिती इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांनी गरीब मुलांनी देखील दिवाळी उत्साहात व आनंदाने साजरी करावी या दृष्टीकोनातून त्यांच्यासाठी कपडे व दिवाळीचा फराळ आणला. साक्री तालुक्यातील काशीदरा व नागाई येथील वस्तीमध्ये कपड्यांचे व फराळाचे वाटप मुख्याध्यापक देव व व्यवस्थापक तुषार देवरे, सागर पाइक, नीलेश माळीचकर, भाग्यश्री पाटील, वैशाली खैरनार, संदीप वाडेकर, प्रमोद खैरनार, प्रशांत ससले व विद्यार्थ्यांच्या हस्ते
करण्यात आले.
शाळेच्या शिक्षिका वैशाली पाटील यांनी दिवाळी सण अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत पाच दिवस साजरा करतात. त्यात गो-बारस, धन आश्विन वद्य, द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी गाईची पाडसासह पूजा केली जाते.
प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आले आहेत. गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात असे मानले जाते. तिला गोमाता म्हणतात. तिची उपयुक्तता ओळखून प्राची काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा आहे. अनेक प्रसंगी आपण दान करत असतो. त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.
“ज्याचे घरी गाय तेथ विठ्ठालचे पाय” असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. गाईपासून दूध, दही, तूप, शेण मिळते. भाऊबीजेला बहिणीला प्रेमाने काहीतरी भेटवस्तू द्यावी, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांना वेशभूषेसाठी स्मिता नेरकर व नीतू पंजाबी यांनी मार्गदर्शन केले. संयोजन मंगेश बेडसे यांनी केले.
रांगोळी योगिता देसले, स्वाती पाटील, गीतल कोठावदे, सीमा बोरसे यांनी केले. भूपेंद्र साळुंके यांनी फलकलेखन केले. सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.