चौफेर न्यूज – विद्यार्थ्यांना आता बोर्ड परीक्षांच्या तणावापासून मुक्ती मिळेल. याची सुरुवात झाली आहे, परंतु आगामी काळात आणखी मोठे बदल पहायला मिळतील. आता विद्यार्थ्यांचे मूल्यांकन एकाच परीक्षेद्वारे होणार नाही, त्यांचा निकाल त्यांच्या वर्षभरातील अभ्यासावर तयार होईल. यामध्ये जे महत्वाचे बदल प्रस्तावित आहेत, त्यामध्ये परीक्षेचे एक असे प्रारूप विकसित केले जात आहे, ज्यामध्ये संपूर्ण कोर्सची परीक्षा अनेक भागात घेतली जाईल. प्रश्नसुद्धा विचारावर आधारित असतील. म्हणजे घोकमपट्टीचे दिवस आता जाणार आहेत.

बदल करण्याची मोहिम बोर्ड परीक्षांसह दुसर्‍या इयत्तांसाठी सुद्धा सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठांसह मेडिकल आणि इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी होणार्‍या प्रवेश परीक्षांमुळे ज्याप्रकारचे तणावपूर्ण वातावरण आणि स्पर्धा वाढली आहे, ती पाहता शिक्षण मंत्रालय परीक्षांमध्ये बदल करण्याची घाई करत आहे. असेही नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात परीक्षा सुधारणांबाबत अनेक शिफारसी करण्यात आल्या आहेत.

परीक्षेत असे बदल व्हावेत की कोचिंग आणि घोकमपट्टी करून पुढे येणार्‍यांच्या ऐवजी असे विद्यार्थी पुढे येऊ शकतात, जे खरोखरच चांगले आहेत, असा विचार केला जात आहे. यासोबतच बोर्ड परीक्षांना सुद्धा अशाप्रकारे डिझाइन केले जात आहे, ज्यात वर्गात नियमित अभ्यास करणारा विद्यार्थी सहजपणे पास होऊ शकतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये परीक्षेला कोर्सच्या छोट्या-छोट्या भागात आयोजित करण्याची तयारी आहे.

मंत्रालयाच्या (ministry of education) या उपक्रमावर सीबीएसईने 2021-22 मध्ये होणार्‍या बोर्ड परीक्षांमध्ये प्रारंभिक अंमलबजावणीची योजना बनवली आहे. यामध्ये 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा आता दोन भागात होईल.

मंत्रालयानुसार, या उपक्रमामुळे संपूर्ण कोर्सचा एकाचवेळी परीक्षेचा येणारा तणाव कमी होईल.
मात्र, हा प्रयत्न तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा बदलाच्या या उपक्रमाला सीबीएसईसह राज्याचे शिक्षण बोर्डसुद्धा ठरलेल्या वेळी अवलंबतील.
सध्या शिक्षण मंत्रालय या संबंधात राज्यांच्या संपर्कात आहे. सीबीएसईने आपल्या शाळांमध्ये सरल आणि परख नावाचे दोन उपक्रमसुद्धा सुरू केले आहेत, जे लवकरच सर्व शाळांमध्ये पहायला मिळतील.

बोर्ड परीक्षांमधील बदलाचा जो एक मोठा उपक्रम असेल, त्यामध्ये आता विद्यार्थ्यांना असे प्रश्न विचारले जातील, जे विचारावर आधारित असतील. यातून त्यांची योग्य पात्रता आणि क्षमता जाणून घेता येईल.

सध्या 2021-22 च्या बोर्ड परीक्षेत असे 20 टक्के प्रश्न असतील, जे बहुपर्यायी (एमसीक्यू), शार्ट अन्सर टाईप (कमी शब्दात उत्तर देणे) आणि लाँग अन्सर टाईप (शब्दांची मर्यादा असणार नाही) इत्यादी प्रकारचे असतील. मात्र, 2025 पर्यंत बोर्ड परीक्षेत शंभर टक्के प्रश्न विचार आधारित असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here