पिंपरी ः शालेय विद्यार्थ्यांवर पर्यावरणाचे संस्कार करणा-या महापालिकेच्या 200 शाळांचा पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने गौरव करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्वच्छ भारत अभियानाची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर अंजली भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर राजू मिसाळ, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे, शिक्षण मंडळाचे सभापती निवृत्ती शिंदे, उपसभापती विष्णु नेवाळे, माजी सभापती विजय लोखंडे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊसाहेब कारेकर, पराग मुंडे, लक्ष्मी धवुल, विकास पाटील, पुरुषोत्तम पिंपळे आदी उपस्थित होते.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील नागरी वस्तीत जावून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. तसेच महापालिकेच्या शाळेला पर्यावरणपूरक शैक्षणिक अभ्यासाची सिडी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज मराठे यांनी केले. तर, प्रभाकर मेरुकर आदी उपस्थित होते.