साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त शाळेत राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अतुल देव; तसेच व्यवस्थापक तुषार देवरे यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दुसर्या इयत्तेतील हेतवी वाघ, तिसर्या इयत्तेतील हर्ष बोरसे यांनी यावेळी भाषणातून मनोगत व्यक्त केले. शिक्षक सुनील वाडेकर यांनी व मुख्याध्यापक अतुल देव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक अतुल देव यांनी आपले विचार व्यक्त करतांना मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते तसेच त्यांच्या कार्यकाळातच सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या, पहिली आयआयटी, युनिवर्सीटी ग्रँन्ट कमिशनची स्थापना त्यांच्या कार्यकाळात झाली असे विचार
व्यक्त केले.